महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
मुंबई लोकप्रिय बातम्या

मुंबईतून तीन लाख रुपये किमतीचे भेसळयुक्त तूप जप्त,अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई यांची कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/प्रतिनिधी – दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुप विक्रेत्यावर कारवाई केली आहे. दि. 18/10/2022 रोजी मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागास प्राप्त माहितीच्या अनुषंगाने मस्जिद बंदर मधील .मे. ऋषभ शुद्ध घी भांडार गोडाऊन, पहिला मजला, 15, श्रीनाथजी बिल्डिंग, केशवजी नाईक रोड, चिंचबंदर, मुंबई-9, येथील तीन तुपाचे अन्न नमुने विश्लेषनासाठी घेऊन उर्वरित 400 किलो, किंमत रु. 2,99,090/- किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

हे अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, विश्लेषण अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल. दिवाळीसारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशासनाने अन्न आस्थापनाच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×