कल्याण/ संघर्ष गांगुर्डे – राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उद्या 20 तारखेला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग देखील सज्ज झाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांसह महापालिका संबंधित शासकीय यंत्रणांकडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचा आवाहनही करण्यात आले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध शासकीय यंत्रणांचे तब्बल 11000 कर्मचारी कार्यरत आहेत त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेसह एस आर पी एफ, होमगार्ड अशा एकूण 3000 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजता पोलीस बंदोबस्तात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप सूरु करण्यात आले आहे. हे साहित्य घेऊन आज हे अधिकारी संबंधित मतदान केंद्रावर पोहचण्यास सुरुवात झाली आहे.