Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी महाराष्ट्र

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी टायगर सेनेचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

चंद्रपूर/प्रतिनिधी – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर (Chandrapur) अंतर्गत सावली येथील मुलींच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केली असल्याचे आदिवासी नेते जितेश कुळमेथे यांनी सांगितले. गृहपाल गीता झुरमुरे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे या मागणीला घेऊन 30 मे रोजी आदिवासी टायगर सेना व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चंद्रपूर यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी (Adivasi) विकास प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

सात दिवसांच्या आत गृहपाल गीता झुरमुरे यांना सेवेतून बडतर्फ करा अन्यथा आमरण उपोषण करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीवर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी माहिती दिली की “आम्ही याबाबत चौकशी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने झुरमुरे यांची नागपूर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी करण्यात आली असून त्याबाबत अहवाल येणे बाकी आहे. महाविद्यालयाचा अहवाल व प्रमाणपत्र आम्हाला मिळाले की आम्ही पुढील कारवाई करू.”

Translate »
X