नेशन न्यूज मराठी टीम.
चाळीसगाव/प्रतिनिधी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन चाळीसगाव येथील एका मंगलकार्यालात करण्यात आला. या शिबिरात खासदार उन्मेष पाटील यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून रक्तदान केला. व पंतप्रधानांना सदिच्छापर शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर वेदान्ता प्रकल्पा बाबत माध्यमांनी विचारणा केली असता खासदार उन्मेष पाटील म्हणाले कि ”वेदांता’ प्रकल्पाला घेऊन सध्या जे आरोप प्रत्यारोप सुरु आहे. हे निरर्थक असून प्रकल्पाचे चेअरमन अग्रवाल यांनी ट्विट करून शिंदे-फडणवीस सरकार येण्याअगोदर कंपनी गुजरातमध्ये घेऊन जाण्याबाबत निर्णय घेतल्याचा सांगितले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे ज्याप्रकारे मोठ्या थाटामाटात भीम गर्जना करत प्रकल्प गेला असा कांगावा करत आहे. हे फक्त युवकांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार असल्याचा टोला खासदार उन्मेष पाटील यांनी लगावला आहे.
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित साधत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर चाळीसगावला अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद व भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. या शिबिराला जळगाव मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी सहभाग नोंदवित रक्तदान केला. व पंतप्रधान मोदी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान सदर शिबिराला रक्तदात्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी दुपारच्या दीड वाजेपर्यंत एकूण १४८ जणांनी रक्तदान केले. याचा आकडा सायंकाळपर्यंत वाढणार असून रक्ताचे संकलन सुरभी ब्लड बँक करणार आहे. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, बीजेपी तालुकाध्यक्ष सुनील निकम, नगरसेवक नितीन पाटील, प्रभाकर चौधरी, भावेश कोठावदे, डॉ. दत्ता भदाणे, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.