नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला / प्रतिनिधी – धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सोलापुर येथील शासकीय विश्रामगृह येथे धनगर समाज आरक्षण समितीचे अध्यक्ष शेखर भंगाळे यांनी धनगर समाज आरक्षण संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले व त्यांचे अंगावर भंडारा (हळद) टाकली असता त्यांचे अंगरक्षकांनी शेखर भंगाळे यांना मारहाण केली.
या घटनेच्या निषेधार्थ’ आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्य़ा विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत.