नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणाऱ्या संविधान आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्यात मराठा आरक्षण हे लागू होण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत चालढकल करण्याचा प्रयत्न करत आहे.
लाठीचार्ज करणारे अधिकारी निलंबित केले आहेत. मात्र आदेश देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनीमा द्यायला हवा, रेल्वेचे खाजगीकरण करण्याला विरोध असून दादरच्या रेल्वेस्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले पाहिजे या मागण्यांसाठी संविधान आर्मी संघटनेने रेल्वे स्टेशनवर आंदोलन केले आहे. दरम्यान आंदोलक रेल्वे अडवणार असल्याने पोलिसांनी तात्काळ आंदोलन स्थळी जात संविधान आर्मी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.