महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

निवडणुकीची विना परवाना पोस्टरबाजी करणाऱ्यांवर होणार कारवाई

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणूकीची सर्वत्रच धामधूम सुरू आहे. राजकीय नेते आपल्या पक्षाचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जन आपल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी मोठ मोठाले पोस्टर्स,फलक आणि झेंडे लावतात. पण त्यातील काही जन हे नियम मोडीत आपली पोस्टरबाजी करीत असतात. अशा विना परवाना पोस्टर बाजीला चाप बसविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका ऍक्शन मोड वर आली आहे. विना परवाना निवडणुकीचे पोस्टर्स लावणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार आहे. 20 मे रोजी निवडणुकीच्या पाचव्या टप्यात कल्याण, ठाणे, मुंबईतील मतदारसंघात निवडणूक होणार आहे. त्यामुळे केडीएमसी सज्ज झाली आहे.

महापालिकेची परवानगी न घेता, विना परवाना निवडणूक विषयक पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/झेंडे/कमानी लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिले, महापालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे,निवडणूक उपायुक्त रमेश मिसाळ,महापालिकेचे सर्व प्रभागांचे सहा आयुक्त आणि 23-भिवंडी लोकसभा व 24-कल्याण लोकसभा परिक्षेत्रातील मंडप कॉन्ट्रॅक्टर्स, मुद्रक, प्रकाशक यांचे समवेत काल सायंकाळी आयोजिलेल्या बैठकीत बोलतांना आयुक्त इंदु राणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.

प्रिंटींग प्रेसचे मालकाने, उमेदवारांचे/पक्षाचे साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारतांना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे पक्षाचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह प्रचार साहित्याची ऑर्डर स्विकारावी, साहित्य छपाई करतांना एकूण प्रतींची संख्या व प्रत्येक प्रतीवर, त्या प्रतीचा अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानी प्रिंट करणारे मालक यांनी सुध्दा उमेदवारांचे/पक्षाचे साहित्य छपाईची ऑर्डर स्वीकारतांना दोन व्यक्तींच्या ओळखीसह व उमेदवाराचे/पक्षाचे प्रतिनिधीचे ओळखपत्रासह ऑर्डर स्विकारावी तसेच महापालिकेची रितसर परवानगी घेऊनच पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानी लावायची कार्यवाही करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी उपस्थितांना दिली. तसेच छपाई करण्यात आलेले पोस्टर्स/बॅनर्स /होर्डिंग्ज/फलक/कमानी यांच्या प्रत्येक प्रतीवर अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. तसेच पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानी यावर महापालिकेची परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक व पब्लिशर्स यांचे नांव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रितसर परवानगी घेऊनसुध्दा पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानींवर परवानगी क्रमांक, परवानगीची मुदत, प्रकाशक व पब्लिशर्स यांचे नांव व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद न केल्यास ते अनधिकृत आहेत असे समजून कारवाई करण्यात येईल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

ज्या तारखेपर्यंत परवानगी दिली आहे ती मुदत संपताच पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानीं व स्ट्रक्चर हे संबंधित एजन्सीनेच काढावयाचे आहे, पब्लिशर्स व पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानीं/झेंडे बनविणाऱ्या एजन्सी यांनी त्यांचे छपाईची संख्या, साईज व याबाबतचा खर्च इ, माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यांचेकडे व महापालिकेकडे तातडीने सादर करावयाचा आहे. तसेच सभा मंडप कॉन्ट्रॅक्टर यांनीसुध्दा सभा/कार्यक्रम संपताच दुसऱ्या दिवशी उभारलेले स्ट्रक्चर काढून टाकावेत, परवानगी कालावधी संपल्या नंतर कोणतेही पोस्टर्स/बॅनर्स/होर्डिंग्ज/फलक/कमानीं इ. आढळुन आल्यास संबंधिताकडून दंड वसूल करण्यात येईल, त्याचप्रमाणे महापालिकेकडून करारावर जाहिरातीच्या जागा घेतलेल्या एजन्सी मालकांनी कोणतीही निवडणूक विषयक जाहिरात ठराविक एका पक्षाला देण्यात येऊ नये. समान न्यायाचे तत्व अवलंबवावे. त्याबाबत उमेदवार/पक्ष यांचे सोबत झालेला करार, त्यासाठी झालेला खर्च याचा तपशील संबंधिताने महापालिका व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे तातडीने सादर करणे आवश्यक आहे, अशाही सूचना महापालिका आयुक्त महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी या बैठकीत दिल्या.टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×