नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – वनपरिक्षेत्र कार्यालय कल्याण व वॉर संस्थेमार्फत कल्याण शहारातील किल्ले दुर्गाडी परिसरातील खाडी किनारा व गांधारी येथील खाडी किनारा येथे परदेशातुन स्थलांतरीत झालेल्या सिगल पक्षांच्या संरक्षण व संवर्धनार्थ जनजागृती मोहिम हाती घेण्यांत आली आहे. या सीगल पक्ष्यांना शेव गाठी खायला दिल्यास आता कारवाई होणार आहे.
दरवर्षी युरोपातुन लाखो सिगल पक्षी भारतात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान येत असतात. सिगल हा एक समुद्री पक्षी असून त्याचे मुख्य अन्न मासे, किटक, किडे, गांडुळ हे आहे. परंतु काही स्थानिक नागरीक या पक्षांना शेव, गाठी, कुरमुरे इत्यादी तेलकट पदार्थ खाऊ घालत आहेत. असे अन्न खाल्याने या पक्षांच्या पाचन व प्रजनन शक्तीवर परिणाम होऊन त्यांचा मृत्यु होऊ शकतो.
याबाबत कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी त्यांचा स्टाफ व वॉर फाऊंडेशन कल्याण चे अध्यक्ष योगेश कांबळे व त्यांच्या टिमने खाडी किनारा लगत येणाऱ्या भागात सिगल बाबत जनजागृती केली व नागरिकांनी या पक्षांना तेलकट पदार्थ खाऊ घालू नये असे आवाहन केले.
तसेच असे कृत्य करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9 व 52 अन्वये गुन्हा असून असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही सांगितले आहे.सदर जनजागृती कार्यक्रम गजेंद्र हिरे, उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रघुनाथ चन्ने वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण, एम. डी. जाधव वनपाल, रोहित भोई वनरक्षक, योगेश रिंगणे वनरक्षक, शरद कंटे वनपाल, विनायक विशे वनरक्षक, व वॉर फाऊंडेशन कल्याणचे अध्यक्ष योगेश कांबळे व सचिव सुहास पवार, संस्थेचे पदाधिकारी प्रमोद आहेर, विशाल कंथारीया, शैलेश अहिरे, स्वप्निल कांबळे, प्रियांका कांबळे, सिद्धेश देसाई, पार्थ पाठारे, रेहान मोतीवाला, फाल्गुनी दलाल, विशाल सोनावणे, श्रीमती श्रुती नेवतकर, श्री. प्रतिक पाटील, अथर्व याराप्नोर, भरत जाधव यांनी पार पाडला.