कल्याण/प्रतिनिधी – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कामगारांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला कल्याण आगारातील एसटी कर्मचारी वर्गाने पाठींबा दिला असून तीन दिवसांपासून कल्याण आगारातील कर्माचार्यानी एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प केली एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाशी वर्गावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे .संपात सहभागी होण्यासाठी कर्मचाऱयांना कामावर न येण्यास परावृत्त करत दमदाटी करून चिथावनी देणाऱ्या सोळा संपकरी कामगारांवर कल्याण आगार प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक यांनी दिली .
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात राज्यभरातील एसटी महामंडळाच्या सर्वच जिल्ह्यातील एसटी आगारातील कर्मचाऱयांनी गेल्या पंधरा दिवसा पासून पुकारलेल्या संपात एसटी महामंडळाच्या कल्याण आगारातील चालक,वाहक,यांत्रिकी विभाग व प्रशासकीय विभागातील ३५० कर्मचारी वर्ग सहभागी झाले असून गेल्या तीन दिवसा पासून कल्याण आगारातून एकही एसटी बस आगारातून निघाली नाही .एसटी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाल्याने एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाश्याचे हाल झाले असून खाजगी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहतूक करणार्यानी प्रवाश्या कडून मनाला वाटेल तसे भाडे आकारात लूटमार सुरू केली आहे.या संपामुळे प्रवाशी वर्गाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने प्रवाशी वर्गात संतापाची लाट पसरली आहे .
तर दुसरीकडे संपात सहभागी होण्यासाठी कल्याण एसटी आगारातील विविध कामगार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अन्य कामगारांना कामावर हजर राहू नये तसेच संपात सहभागी होण्यासाठी दमदाटी करून चिथावणी देत असल्याने वाहतूक पूर्ण पणे ठप्प केली आहे. नागरिकानां वेठीस धरून बेमुदत संप सुरू ठेवला आहे. शासन संप लवकरात लवकर मिटावा यासाठी मध्यमार्ग काढत असतानाही कामगार जुमानत नसून संप मागे घेण्यास तयार नसल्याने संप अधिकच चिघळवत आहे.कल्याण आगारातील संपाला पाठींबा देत चिधावणी देणारे तसेच अन्य कामगाराना कामावर हजर न राहण्यास परावृत्त करणारे दोन मँकनिक, तीन वाहतूक निरीक्षक व अकरा चालक व वाहक अश्या
सोळा कामगारांवर आगार प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारीत त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे शासनाच्या आदेशा नुसार सोळा कर्मचाऱयां वर निलंबनाची केल्याची माहिती आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी दिली .