नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शहर वाहतूक उपशाखा कल्याण अंतर्गत कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक व खडक पाडा सर्कल या ठिकाणी आज सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान फ्लॅश डिप्लॉयमेंट करून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. यामध्ये विदाऊट हेल्मेट 261, विदाऊट सीट बेल्ट 34, ब्लॅक फिल्म 03, ट्रिपल सीट 02, फ्रंट सीट 11, विदाऊट लायसन 02, गणवेश न घालणे 10, फोनवर बोलणे 4, सिग्नल जम्पिंग 143, व इतर 23 अशा एकूण 493 केसेस कसूरदार वाहन चालकांवर कारवाई करून 5 लाख 71 हजार 800 इतका दंड आकारण्यात आला.
त्या पैकी 4 हजार 700 दंड जागीच वसूल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये कोळसेवाडी विभागाचे 2 पोलीस अंमलदार, डोंबिवली उपविभागाचे 2 अंमलदार व कल्याण उप विभागाचे 3 पोलीस अधिकारी व 7 पोलीस अंमलदार व 8 वार्डन असे एकूण 3 अधिकारी, 11 अंमलदार, 8 वॉर्डन हजर होते. यादरम्यान विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीटबेल्ट, सिग्नल जंप करणाऱ्या वाहन चालकांचे वाहतूक नियमां बाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच विशिष्ट वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांनी मोटार वाहन नियमांचे पालन करण्याची माहिती देऊन व केडीएमसी सिग्लन वरील पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम द्वारे जनजागृती सुद्धा केली असल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक उपशाखा पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दिली.