नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – दुध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ अन त्यातून होणारी विषबाधा याबाबच्या घटना सणाच्या उत्साहाला गालबोट लावतात. मावा व त्यापासून इतर खाद्य पदार्थ बनवताना अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने हि भेसळ करणारी टोळी कार्यरत असते. ऐन सणासुदीच्या दिवसात दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न औषध प्रशासन विभागाने मोहीम सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये भेसळयुक्त 2200 लिटर दूध आणि 40 किलो खवा नष्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 संस्थांची तपासणी करून ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासन तसेच दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक दुग्ध व्यवसाय केला जातो. आणि याच तालुक्यामध्ये सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सुरेश केदार यांनी दिली आहे.