महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण ग्रामीण खोणी गावातील ५५ वीजचोरांवर कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर बुधवारी हल्ला झालेल्या खोणी गावात महावितरणने पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (२५ मे) धडक कारवाई केली. या मोहिमेत ५५ ठिकाणी वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर, १९ ठिकाणी संशयास्पद मीटर आढळून आले आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्यान हल्ल्याच्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

डोंबिवली नजिकच्या खोणीगाव (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे बुधवारी दुपारी महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला करण्यात आला होता. यात बंदोबस्तावर असलेल्या एका पोलिस कर्मचारी जखमी तर महावितरणचे कर्मचारी-अधिकाऱ्यांना धक्काबुक्की, दमदाटी करण्यात आली होती. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या सक्रिय सहकार्याने गुरुवारी खोणी गावात धडक वीजचोरी शोध मोहिम राबवण्यात आली. महावितरणचे ११३ कर्मचारी, ३२ अभियंते, १५ सुरक्षारक्षक, १८ महिला कर्मचारी आणि बंदोबस्तासाठीचे ३० पोलिस कर्मचारी यांच्या २१ पथकांनी खोणी गावातील २५४ ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी केली. या तपासणीत ५५ जणांकडे थेट वीजचोरी, ३ ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर तर १९ ग्राहकांकडील वीजमीटर संशयास्पद आढळले.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करून मीटर काढलेले असताना थेट वीजचोरी, मीटरमध्ये फेरफार, मीटरकडे येणाऱ्या केबलला जॉईंट करून वीज वापराची नोंद मीटरमध्ये होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी, असे प्रकार तपासणीत आढळून आले आहेत. भ्याड हल्ल्यानंतर न डगमगता वीज चोरांविरुद्ध जोमाने कारवाई सुरू राहणार असल्याचा संदेश गुरुवारच्या धडक कारवाईतून देण्यात आला. उपसंचालक सुमीत कुमार, अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, उपकार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती या महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बागडे आणि पोलिस निरिक्षक बाळासाहेब पवार, सुनिल तारमाळे, अविनाश वणवे, मदने या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईत प्रत्यक्ष सहभाग घेतला. या परिसरात पोलिसांच्या सहकार्याने वीज चोरीविरुद्ध अधिक प्रभावीपणे कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी दिली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×