Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

एटीएम मशीन फोडून २४ लाखांची लूट करणारा आरोपी गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

जालना/प्रतिनिधी – रात्रीच्या शांततेचा फायदा घेऊन चोरांनी चक्क एटीएम (Atm) मशीनला गॅस कटरच्या सहाय्याने फोडून लाखों रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना जालना शहरातील महावीर चौकात काही दिवसांआधी घडली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. पोलिसांसमोर एटीएम चोरट्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते. 24 लाख 54 हजार 300 रुपयांची रोख रक्कम आरोपींनी पळवून नेली. चोरट्यांनी एटीएमच्या सीसीटीव्ही (Cctv) डिव्हीआर सुध्दा पळवून नेले असून चोरटे सीसीटीव्ही कॕमेऱ्यात कैद झाले होते. याच माहितीच्या आधारावर पोलिसांचा शोध सुरू होता.

सदर बाजार आणि जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरयाणा राज्यातून आरोपीला ताब्यात घेतले. साचीद रज्जोदीन खान वय 25 वर्ष असं संशयित आरोपीचे नाव असून त्याला हरयाणा राज्यातील (फिरोजपुर झिर्का जि. नुम) या ठिकाणाहून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीने त्याच्या 3 साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली असून ते हरयाणा आणि राजस्थानचे रहिवाशी आहेत. त्यांना देखील लवकरच पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या पूर्वी या सराईत गुन्हेगारांनी मध्यप्रदेश, नाशिक आणि नागपूर मध्ये पण असाच गुन्हा केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली. एका दिवसाआधी चंदनझिरा भागात पुन्हा एक एटीएम मशीन फोडण्याची घटना घडली आहे. त्यासंदर्भात पोलिस (Police) तपास करत असून लवकरच आरोपींना निष्पन्न करण्यात येईल असं अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी म्हणाले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, सुधीर वाघमारे, योगेश सहाने, धिरज भोसले, सर्व स्थागुशा, जालना यांनी केली आहे.

Translate »
X