नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणावरून ट्रक चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत पोलिसांना एका आरोपीला अटक करण्यात यश मिळाले. या सर्व प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर रोड परिसरात सिद्धाई या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या प्लास्टरसाठी लागणारा माल घेऊन एक ट्रक आला. या ट्रकमधील माल इमारतीसमोर उतरविण्याचे काम सुरु होते. काम सुरु असताना त्याठिकाणी 2 लोक आले. त्या दोघांनी ट्रक चालकाला गाडीमधून खाली उतरविले. त्यानंर या दोघांनी ट्रक चालक बालाजी कोपनर याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आमच्या परिसरात येऊन माल खाली करत असताना आमच्या हमालाला माल उतविरण्याचे काम का दिले नाही असे बोलत त्यांनी ट्रक चालकाशी वाद घालायला सुरुवात केली. ट्रक चालक बालाजी यांनी त्यांना सांगितले की, मी माझे काम करत तरी माझ्याशी का वाद घालू नका. यावर त्या दोन्ही तरुणांनी ट्रक चालकाचे काहीही न ऐकता त्याला मारहाण केली. दे दोघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी ट्रक चालकाच्या मानेवर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी अक्षय कारंडे याला अटक केली आहे. अक्षय याच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोप विशाल पानवलकर याचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे.