प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवली मध्ये लॉकडाउनच्या काळात बरचसे नागरिक गावाकडे गेले असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले होते.
त्याच बरोबर सोनसाखळी चोरांनी उच्छाद घातला होता.
या प्रकरणाला आळा घालण्यासाठी मानपाडा पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग,कोबिंग ऑपरेशन व रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असणाऱ्या चा शोध सुरू करून.
सहा घरफोडी करणाऱ्या आरोपींना तसेच दोन सोनसाखळी चोरांना ,व दोन महिन्यांपूर्वी ३०७ च्या गुन्ह्यामधील आरोपी याला मानपाडा पोलिसांनी पुणे खडकवासला या ठिकानाहून अटक केली.
यावेळी पोलिसांनी एकूण तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.
Related Posts