नेशन न्यूज मराठी टीम.
रायगड / प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड तिसे रेल्वे गेटवर कर्तव्यावर असलेल्या चंद्रकांत कांबळे यांची भरदिवसा डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. या हत्येचे गूढ उकलने आणि आरोपीला अटक करण्याचे मोठे आव्हान रायगड पोलिसांपुढे होते. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व संपूर्ण टीम या प्रकरणी अहोरात्र तपास करीत होती.या हत्येच्या तपासकामी रायगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती.
तपासा मध्ये काही घरगुती वादातून आरोपी विजय रमेश शेट्टी याने चंद्रकांत कांबळे यांची हत्या केली असे उघडकीस आले. खून करून विजय शेट्टी मोटारसायकल वरून जात येत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये आढळून आले होते.
तांत्रिक तपास करीत असताना आरोपी शेट्टी अक्कलकोट जिल्हा सोलापूर याठिकाणी असल्याची माहिती मिळाली. तपास करत असताना पथकाने आपले कौशल्य दाखवून अक्कलकोट येथून आरोपी विजय शेट्टी याला अटक केली. त्याच्याकडील दोन गावठी बनावटीचे पिस्तुल, एक एक्स्ट्रा मॅगझीनवं , 18 जिवंत काडतुसे, 1 रिकामी पुंगळी हे साहित्य लपवून ठेवलेल्या ठिकाणावरून हस्तगत केले आहे. या गुन्ह्याच्या तपासात रायगड पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.