नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – “विश्वसनीय बातमी सादर करणे ही माध्यमांची मुख्य जबाबदारी असून बातम्यांच्या माध्यमातून दिली जाणारी माहिती सार्वजनिकरित्या प्रसारित करण्यापूर्वी वस्तुस्थिती योग्यरित्या तपासली पाहिजे”, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज सांगितले.
आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियनची सर्वसाधारण सभा 2022 च्या उद्घाटन समारंभात अनुराग ठाकूर बोलत होते. “बातमी ज्या वेगाने प्रसारित केली जाते ते महत्त्वाचे आहेच मात्र ती प्रसारित करताना अचूकता अधिक महत्वाची आहे आणि बातमी देणाऱ्याने हे प्राधान्याने लक्षात ठेवायला हवे” असे त्यांनी सांगितले. समाजमाध्यमांच्या विस्तारामुळे , खोट्या बातम्याही प्रसारित होत आहेत असे सांगत यादृष्टीने असत्यापित दावे खोडून काढत लोकांसमोर सत्य मांडण्यासाठी सरकारने तत्परतेने भारत सरकारच्या पत्रसूचना कार्यालयामध्ये फॅक्ट चेक कक्षाची स्थापना केली, अशी माहिती मंत्र्यांनी आशिया-प्रशांत प्रदेशातील प्रसारकांच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना दिली.
लोकांचा विश्वास कायम राखणे हे जबाबदार माध्यम संस्थांसाठी सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असायला हवे, हे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी अधोरेखित केले. नेहमीच सत्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल आणि सत्य वृत्तांकनासाठी लोकांचा विश्वास जिंकल्याचे श्रेय त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणी या प्रसारकांना दिले. संकटाच्या काळात माध्यमांची भूमिका महत्त्वाची बनते कारण ती थेट जीव वाचवण्याशी संबंधित असते हे अधोरेखित करत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन योजनांमध्ये प्रसारमाध्यमांचे महत्वाचे स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड 19 महामारीच्या काळात घरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी दिलेल्या योगदानाचे श्रेय माध्यमांना देत माध्यमानी लोकांना बाह्य जगाशी जोडले असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. भारतीय प्रसारमाध्यमांनी आणि विशेषकरून दूरदर्शन आणि आकाशवाणीने केलेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती मंत्र्यांनी दिली. दूरदर्शन आणि आकाशवाणीने सार्वजनिक सेवेच्या जनादेशाची अतिशय समाधानकारकपणे पूर्तता केली आणि महामारीच्या काळात लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. भारतीय माध्यमांनी सर्वसाधारणपणे कोविड-19 जागरूकता संदेश, महत्त्वाची सरकारी मार्गदर्शक तत्त्वे आणि डॉक्टरांशी मोफत ऑनलाइन सल्ला देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित केले, असे ते म्हणाले. प्रसार भारतीने कोविड 19 मुळे शंभरहून अधिक जणांना गमावले तरीही या संस्थेचे सार्वजनिक सेवा प्रसारणाचे काम सुरूच राहिले, असे मंत्री म्हणाले.
“माध्यमांनी सरकार आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम केले पाहिजे आणि राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावर सतत प्रतिसाद द्यायला हवे .” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा या व्यासपीठावरून पुनरुच्चार करत ठाकूर यांनी माध्यमांना प्रशासनात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले . प्रसारण संस्थांची संघटना म्हणून एबीयू म्हणजेच आशिया -पॅसिफिक ब्रॉडकास्टींग यूनियनने माध्यमकर्मींना प्रशिक्षित करणे आणि त्यांना संकटाच्या काळातील माध्यमांच्या भूमिकेबद्दल सर्वोत्तम व्यावसायिक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे आणि भारत अशा सर्व प्रयत्नांसाठी तयार असल्याचे आश्वासन अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिले.
एबीयू (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) सदस्यांसोबत असलेले भारताचे सहकार्य आणि भागीदारी यावरही त्यांनी चर्चा केली. प्रसारण उद्योगाच्या विविध पैलूंचा समावेश असलेले प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, प्रसार भारतीची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था, नॅशनल अकॅडमी ऑफ ब्रॉडकास्टिंग आणि मल्टीमीडिया, ( एन ए बी एम) एबीयू मीडिया अकादमीशी सहकार्य करत आहे, असे ते म्हणाले. आशयाची देवाणघेवाण, सह-निर्मिती, क्षमता बांधणी, इत्यादी क्षेत्रात भारताने 40 देशांसोबत द्विपक्षीय करार केले असून त्यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भूतान, फिजी, मालदीव, नेपाळ, दक्षिण कोरिया, थायलंड आणि व्हिएतनाम अशा अनेक एबीयू सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे.
“मार्च 2022 मध्ये आम्ही प्रसारण क्षेत्रात ऑस्ट्रेलियासोबत एकमेकांच्या कार्यक्रमांशी संबंधित भागीदारी केली आहे. विविध शैली आणि प्रकारच्या कार्यक्रमांचे संयुक्त प्रसारण आणि सहनिर्मितीसाठी दोन्ही देशातील प्रसारक संधींचा शोध घेत आहेत. “असे त्यांनी सांगितले.
आशिया पॅसिफिक क्षेत्रात एबीयू ची महत्वपूर्ण भूमिका मसागाकी यांनी यावेळी विशद केली आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या बातम्या आपापसात सामायिक करण्यासाठी या प्रदेशातील सर्व सार्वजनिक सेवा प्रसारकांनी केलेल्या सक्रिय प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
आशिया प्रशांत क्षेत्र विविधतेने समृद्ध असले तरी आपण सर्व सदस्य राष्ट्रांना यात एकसमानता दिसून येते आणि समृद्ध विविधतेतील खऱ्या एकतेचे दर्शन होते, असे जावद मोटाघी म्हणाले. दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारकांच्या सामूहिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी एबीयू च्या भूमिकेचे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, यांनी आपल्या स्वागतपर भाषणात कौतुक केले.
भारताची सार्वजनिक सेवा प्रसारक, प्रसार भारती, 59 व्या एबीयू 2022 सर्वसाधारण सभेचे आयोजन करत आहे. ” लोकांची सेवा, संकटकाळात माध्यमांची भूमिका’ ही यावर्षीच्या सभेची संकल्पना आहे. नवी दिल्ली येथे आज माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते सर्वसाधारण सभेचे उद्घाटन झाले. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा, एबीयू चे अध्यक्ष मासागाकी सतोरू आणि सरचिटणीस जावद मोटाघी उपस्थित होते. एबीयू (आशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन) ही आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील प्रसारण संस्थांची ना नफा तत्वावर चालणारी व्यावसायिक संघटना आहे. सुमारे 50 संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 40 देशांतील 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी आहेत.
Related Posts
-
सुभाष मैदानातील क्रीडा संकुलासाठी केंद्रीय क्रीडा मंत्री यांचे सकारात्मक आश्वासन
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - खेलो इंडिया…
-
महापौर हा भाजपाचाच होणार -मंत्री रवींद्र चव्हाण
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत…
-
बनावट नकाशांबाबत दोषींवर कारवाई होणार - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
नेशन न्युज मराठी टीम. मुबंई- मुंबई उपनगर जिल्ह्यातील भूमी अभिलेख…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर तीन दिवस कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी…
-
मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते "चल मन वृंदावन" कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - केंद्रीय माहिती…
-
भाजप एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवते - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - धनगर समाज…
-
मंत्री छगन भुजबळांविरोधात पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील अंबड…
-
नरेंद्र मोदींनी भारत कधीच जोडलाय तुम्ही आधी तुमची पार्टी जोडा - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी नंतर…
-
महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात होणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नेशन न्युज मराठी टिम. नागपूर/प्रतिनिधी- महाराष्ट्राचा पहिला दिव्यांग पार्क नागपूरात…
-
हनुमानजी नवनीत राणांना दणका देणार - यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अमरावती/प्रतिनिधी - आज हनुमान जयंतीच्या…
-
नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटच्या वित्त समितीची मंजुरी
नवी दिल्ली/प्रतिनिधी - नागपूर येथील नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्रीय…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडियाच्या ‘डॅशबोर्ड’चे केले अनावरण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा व्यवहार…
-
ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते प्रारंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क नवी दिल्ली - नवोन्मेषाला चालना आणि…
-
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची ३९वी बैठक संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची 39 वी…
-
ऑस्कर पुरस्कारप्राप्त एलिफंट व्हिस्परर्सच्या टीमची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘कस्तूरी कॉटन भारत’ संकेतस्थळाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य…
-
कल्याणात काँग्रेसकडून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाबाबत पोस्टरबाजी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - भारत जोडो यात्रेदरम्यान…
-
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते समुदाय रेडिओ पुरस्कारांचे वितरण
नेशन न्युज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
केडीएमसीचे खराब रस्ते,अस्वच्छता पाहून केंद्रीय मंत्री नाराज,अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोबिवली महानगर पालिकेत…
-
जातीपातीचे राजकारण व भ्रष्टाचारामुळे जनतेने भाजपला नाकारले -यशोमती ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस बहुमताकडे…
-
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या पोर्टलचा प्रांरभ
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय क्रीडा दिन…
-
कॉप २७ परिषदेच्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी मांडली भारताची भूमिका
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - यूएनएफसीसीसीच्या कॉन्फरन्स ऑफ…
-
प्राध्यापक संघटच्या वतीने मंत्री उदय सामंत यांचा सत्कार
औरंगाबाद/प्रतिनिधी - प्राध्यापकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून सर्व…
-
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे राजधानीत अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - FIH ओदिशा हॉकी…
-
पुणे महानगराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
पुणे/प्रतिनिधी - पुणे महानगरातील विमानतळ, मेट्रो प्रकल्प तसेच नदी विकास प्रकल्पाला गती…
-
अमरावतीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात धनगर बांधव आक्रमक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - मंत्री राधाकृष्ण…
-
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तक्षशिला क्रीडा संकुलाचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील…
-
विद्यापीठ लॅब,विविध रोग चाचण्यांसाठी कायमस्वरूपी यंत्रणा - महिला व बालविकास मंत्री ऍड.यशोमती ठाकूर
प्रतिनिधी. अमरावती - कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन अत्यंत कमी काळात…
-
साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंच्या घरासमोर शेतकऱ्याने केला आत्मदहनाचा प्रयत्न
नेशन न्यूज मराठी टिम. सातारा/प्रतिनिधी - खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून…
-
भारताला चित्रीकरण आणि चित्रपटनिर्मितीनंतरच्या प्रक्रियेचं सर्वात पसंतीचे केंद्र बनवणार - मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी - “भारताला, चित्रीकरण आणि चित्रपट…
-
जगभरात राष्ट्राचा गौरव वाढविण्यात चित्रपट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - जगभरात राष्ट्राचा गौरव वाढविण्यात…
-
चंद्रकांत पाटील यांना मंत्री पदावरून बर्खास्त करा,वंचितची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - उच्च व तंत्र शिक्षण…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे १८ नोव्हेंबरला डोंबिवलीत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या म्हणजेच १८…
-
आयआयटी मुंबईच्या नवीन वसतिगृहाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र…
-
जालना जिल्हात झळकले कृषी मंत्री व पालकमंत्री हरवल्याचे बॅनर
नेशन न्यूज मराठी टीम. जालना/प्रतिनिधी - जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात मागील…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. अहमदनगर/प्रतिनिधी - केंद्रीय मंत्री नारायण…
-
जगात क्रीडा क्षेत्रातील अव्वल १० देशांमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यासाठी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केवडिया - केंद्रीय युवा व्यवहार आणि…
-
पशुसंवर्धनविषयी केंद्राकडे मंत्री सुनील केदार यांच्या विविध मागण्या
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - जनावरांचा विम्याचा निधी,…
-
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत…
-
मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्त वाहिन्यांपासूनच - अनुराग ठाकूर
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय माहिती आणि…
-
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - डॉ. श्रीकांत शिंदे…
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - केंद्रीय सूक्ष्म, लघु व…
-
औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगतीमार्ग बांधण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद- औरंगाबाद ते पुणे नवीन द्रुतगती…
-
कल्याण डोंबिवलीमध्ये विकास हरवल्यासारखा दिसतोय -गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/7zNXrCfrVAc कल्याण - आगामी केडीएमसी निवडणुकीच्या…
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ग्रीन हायड्रोजनबद्दल जनजागृती करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - केंद्रीय रस्ते वाहतूक…
-
खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे - भारताच्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय…
-
आमचं रक्षण हे हनुमान रायांनी केलं यशोमती ठाकूर यांचा विरोधकांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती/प्रतिनिधी - नागपूर नंतर विदर्भातील सर्वात…
-
कल्याण डोंबिवलीत शिवसैनिक आक्रमक, केंद्रीय मंत्री नारायण राणेच्या विरोधात जोरदार निदर्शने
कल्याण/प्रतिनिधी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी…
-
सोलापुरात केंद्रीय पथकापुढे शेतकऱ्यानी मांडल्या व्यथा
प्रतिनिधी. सोलापूर- ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने सिना व…