नेशन न्यूज़ मराठी टीम.
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्या वरून १७ डिसेंबर रोजी शिंदे गटाकडून डोंबिवली बंदची हाक दिली गेली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि त्याचा बद्दल सुषमा अंधारे यांचे वक्तव्य करणे हे निषेधार्थ आहे आम्ही त्याच्या वक्तव्याचा निषेध करतो, पण जनतेला वेठीस धरून बंद पुकाराने हे आम्हाला मान्य नाही आणि ते आम्हाला पटत नाही. त्यामुळे बंद मागे घ्यावा असे आवाहन राजू पाटील यांनी शिंदे गटाला केले आहे.बंद
त्याचं बरोबर जेव्हा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चुकीचे वक्तव्य झाले तेव्हा अशा प्रकारची भूमिका का घेतली घेली नाही असा सवालही बंद करणाऱ्याना राजू पाटील यांनी विचारला आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत राजकारण करू नका, जे काही कराल ते प्रामाणिक पणे केले पाहिजे असा सल्लाही राजू पाटील यांनी शिंदेगटाला दिला.
महाराष्ट्राची अस्मिता साधू संत,महापुरुष व शिवाजी महाराज पण आहे त्याच्या बद्दलच्या वक्तव्यावर जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती पण यांनी घेतली गेली नाही अशा वेळेस राजकारण बाजूला ठेवा असेही ते म्हणाले.त्याचं बरोबर विनंतीही केली आहेकी लोकांना नाहक त्रास होईल अशी बंदची हाक मागे घ्या.
आमदार राजू पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेतच तसेच ते लोकांमध्ये इतर राजकारण्यान पेक्षा का लोकप्रिय आहे हे त्याच्या या प्रतिक्रियेवरून दिसून येते. आपल्या राजकारणाचा नाहक त्रास लोकांना नको अशी भूमिका स्पष्ट करून जनतेबद्दलची काळजी दिसून येते. त्याच बरोबर आपल्या राजकारणात जनतेला कोणत्याही प्रकारची हानी होता कामा नये यात आमदार राजू पाटील यांची लोकांचा विचार करणाऱ्या लोकप्रतिनिधीची प्रामाणिक तळमळ दिसून येते.