महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी शिक्षण

सीएसआयआर-एनआयओ आणि बिट्स पिलानी यांच्यात शैक्षणिक करार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

पणजी/प्रतिनिधी – सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि बिटस पिलानी, के के बिर्ला, गोवा यांच्यादरम्यान आज परस्पर सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही संस्था दरम्यान जीवशास्त्र, रसायनशास्त्र, सागरी उपकरणे, उच्च क्षमतेच्या संगणन क्षेत्रात दीर्घकालीन शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

सीएसआयआर-एनआयओचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग, बिट्स पिलानीचे संचालक प्रो सुमन कुंडू, यांनी करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी बिट्स पिलानीचे प्रशासकीय संचालक डी.एम.कुलकर्णी, प्रो. मीनल कौशिक आणि एनआयओचे डॉ व्ही व्ही सनील कुमार, व्यंकट कृष्णमुर्ती यांची उपस्थिती होती.

सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि के के बिर्ला बीटस पिलानी संस्थेदरम्यान विविध वैज्ञानिक आणि शास्त्रीय विषयांवर सहकार्य केले जाते. या करारामुळे सागरी संशोधनात दोन्ही संस्थांच्या परस्पर सहकार्याने काम केले जाईल.  

सीएसआयआर-एनआयओने महासागराविषयी माहिती संकलन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि ओशन मॉडेलिंग या क्षेत्रातील शिस्तबद्ध आणि केंद्रित संशोधनामुळे आपली सर्वोच्च मानके राखली आहेत. सामंजस्य करारामुळे दोन्ही सागरी संशोधन क्षेत्रातील कौशल्याचा वापर आणि सामायिकरण दोन्ही संस्थांसाठी सुलभ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×