Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ताज्या घडामोडी राजकीय

कल्याणात फेर निवडणूक न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा अभिजीत बिचुकले यांचा इशारा

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

कल्याण/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक पार पडली. मतदान करण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. परंतु मतदान यादीतून ८० हजार मतदारांची नावे गायब असल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. मात्र आता या वादात नवीन ठिणगी पडली आहे, कारणही तसेच आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी प्रशासनाला या बद्दल जाब विचारले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले “कल्याण मतदार संघातील सुमारे ८० हजार मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आले होते. मतदानापासून ८० हजार मतदार वंचित आहेत. त्यामुळे मतदान आयोगाने पुन्हा कल्याण मतदारसंघात मतदान घ्यायला हवे. असे झाले नाही तर मी २७ मे पासून आमरण उपोषण करणार” असा इशारा अभिजित बीचुकले यांनी सरकारला दिला आहे.

Translate »
X