नेशन न्यूज मरठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारकडून घेतले जाणारे निर्णय पाहता नागरिक त्रस्त असलेले दिसून येत आहे. नागरिकांचे न सुटलेले नागरी प्रश्न त्यांना प्रत्यक्ष भेटून समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आम आदमी पार्टी झाडू घेवून निघाली आहे. विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न, तसेच वाढती बेरोजगारी, महागाई आणि शेती विषयक प्रश्नांवर शासनाची उदासीनता यासारख्या अनेक विषयांवर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने झाडू यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या झाडू यात्रेच्या माध्यमातून आम आदमी पक्षाचे पदाधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहे. व त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
या झाडू यात्रेची सेवाग्राम वर्धा येथून महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी 2 ऑक्टोंबर रोजी सुरुवात होणार असून ही यात्रा विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा , अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेदरम्यान ज्या जिल्ह्यातून ही यात्रा जात आहे, त्या जिल्ह्याच्या विविध ठिकाणी सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. ही झाडू यात्रा विदर्भाचा दौरा करत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे समापन करण्यात येणार आहे. या संपूर्ण यात्रेमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल भाई इटालिया, युवा नेतृत्व, त्याच बरोबर राज्य संघटक संदीप देसाई, अजित फाटके, मनीष दामोदर मोडक, भूषण धाकुलकर यांच्या उपस्थितीत असणार आहे.