नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /प्रतिनिधी –सध्याची राजकिय परिस्थितीत पाहता जनतेच्या महत्वाच्या समस्यांवर कोणत्याही राजकीय पक्षाला काम करण्याची मानसीकता दिसत नाही. राज्यात फक्त मंत्री मडंळाचा विस्तार आणि निधी याबाबत चर्चा सुरू आहेत. जनतेच्या समस्यांवर काम करत असलेल्या आम आदमी पक्षाने आता निवडणूका पुर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला असुन राज्याचे सह प्रभारी तसेच उपाध्यक्ष धनजय शिंदे हे स्वतः कार्यकर्त्याच्या बैठका घेत आहेत. अशाच प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राची बैठक कल्याण पूर्वेत पार पडली. आगामी केडीएमसी निवडणूक आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी कल्याण डोबिवली अध्यक्ष धनजय जोगदंड, उपाध्यक्ष रवि केदारे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा एक दिवसाचा दौरा केला असून, कल्याण मध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत चर्चा केली. संघटना बांधणी, आगामी निवडणूक, पक्षाची वाटचाल कशी असली पाहिजे याबाबत चर्चा केली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिति, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार आहोत. कल्याण मध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अनेक वर्षांपासून काम करत असून कल्याणमध्ये एक नवीन पर्याय म्हणून आम आदमी पक्ष उदयास येत असून नागरिकांनी संधी दिल्यास दिल्ली प्रमाणे याठिकाणी काम करू असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.