नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली परिसरात आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून, कल्याण शीळ रोड तसेच शहरातील काही भागात बड्या गृहसंकुलातील जाहीरातीचे होर्डिंग लागलेले आहेत. हे होर्डींग अनधिकृत असून यावर कारवाई करण्यात यावी. तसेच गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने शहरातील रस्ते हे खड्डे मुक्त करुन नागरिकांना चांगली सुविधा द्यावी अश्या प्रकारे विविध मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आम आदमी पार्टीने केडीएमसी मुख्यालय बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
16 नोव्हेंबर 2022 रोजी महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाला आम आदमी पार्टीने अनाधिकृत होर्डींग संदर्भात त्या पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने पडताळणी करून कल्याण शीळ रोड वरील 40 ते 50 होर्डिंग अनधिकृत घोषित केल्या. त्यानंतर 17 एप्रिल 2023 रोजी 78 लाखाचा दंड लावला असून अजून पर्यंत त्या होर्डींग जसेच्या तसे आहेत. एकाही होर्डिंगवर कारवाई केली गेली नाही.
यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे कल्याण शहर अध्यक्ष जोगदंड यांनी सांगितले गरिबांच्या घरावरती हातोडे महापालिका चालवते पण श्रीमंतांच्या ते अजून उभारी देतात आम आदमी पार्टीच्या पक्षाने वारंवार महापालिकेचे उपायुक्त यांना आम्ही वारंवार भेटलो आणि अनाधिकृत च्या होल्डिंग आहेत त्यावर कारवाई करा संबंधितांवरती गुन्हे दाखल करा. त्यांनी कुठलीच कारवाई न केल्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहे.
तसेच महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यातील पडलेल्या खड्ड्यांमुळे चक्की नाका परिसरामध्ये जुलै महिन्यात आम्ही आंदोलने केली. पण महानगरपालिकेने अद्याप देखील कुठले खड्डे भरलेले नाही. आता गणेशोत्सव जवळच आलेला आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली मधिल रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत उप आयुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता अनाधिकृत जाहिरात फलका बाबत संदर्भीतावर ७४ लक्ष रू. दंडात्मक कारवाईचे पत्र दिले असून दरम्यान संदर्भीतांनी जाहिरात होर्डिंग बाबत परवानगी अर्ज कागदपत्रे सादर केली आहेत. तसेच संदर्भीत अनाधिकृत जाहिरात होर्डिंग्ज काढण्याबाबत संदर्भीत प्रभागक्षेत्र आधिकारीना डिसेंबर मध्ये आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.