नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – नशिक मध्ये खुणाचं सत्र सुरूच असून आर्थिक देवाणघेवाण च्या वादातून मयूर दातीर या युवकाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आली आहे. अंबडच्या महालक्ष्मी भागात भर दिवसा दुपारच्या सुमारास आर्थिक वादातून तीन जणांनी मयूर दातीर त्याच्या छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात मयूर दातीराचा जागीच मृत्यू झाला असून, नाशिक शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही.सरकार वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दित लिव्ह इन रिलेशनशिप च्या वादातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा दुपारच्या वेळी अंबड परिसरात एका युवकाची हत्या करण्यात आली आहे.
हत्या झालेला मयूर दातीर हा सुद्धा रेकॉर्ड वरील आरोपी असून हत्या करणारा देखील हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. संशयित करण कडूस्कर याच्यावर आधीच 302, घरफोड्या, लूटमार असे एकूण 18 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. दारू पिण्यासाठी पैसे मागितले म्हणून ही हत्या करण्यात आली आहे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक मधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मोक्का, गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.