Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू

नेशन न्यूज मराठी टीम.

नांदेड / प्रतिनिधी – हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा परिसरात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा मधील पावसात शेतात काम करणारी महिला शांताबाई पुंजाराम खंदारे या महिलेवर वीज पडून तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकंबा गावावर शोककळा पसरली आहे.

अगोदरच नुकसानीच्या गर्तेत सापडलेला शेतकरी परेशान आहे.अशातच एका अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. हिमायतनगर तालुक्यात झालेल्या पावसामध्ये, शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे.

ही बातमी समजताच हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधव पाटील जवळगावकर तात्काळ मयत खंदारे कुटुंबाची हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले व त्यांना शासनाकडून जी काही मदत देण्यात येईल ह्यासाठी मी प्रयत्न करतो, असे सांगितले. मयत महिलेच्या मृत्यू पश्चात पती, तीन मुले व दोन मुली नातूपंतू असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X