नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील वालधूनी परिसरात राहणारी २४ वर्षीय महिला प्रियंका गायकवाड तिच्या माहेरी आली होती. तिने दहा दिवसापूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे. प्रियंका ही तिच्या पतीसोबत पुण्यातील चाकण येथे राहत होती. ती माहेरी आल्यावर व्यवस्थित होती. परंतू तीन दिवसापूर्वी तिला त्रास झाला. प्रियंका उपचारासाठी या परिसरातील डॉक्टर सुनिल मांढरे यांच्या क्लिनिकमध्ये गेली. डॉक्टरने तिच्यावर उपचार सुरु केले. तिला ताप येत होता डॉक्टरने सांगितले होते की, काही घाबरण्याची गरज नाही. मी तुमचा उपचार करतो. तुम्ही बऱ्या व्हाल. मात्र प्रियंकाला बुधवारी जास्त त्रास झाला. याच दरम्यान प्रियंकाचा मृत्यू झाला.
त्यानंतर स्थानिक नागरीकांनी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. यावेळी डॉक्टर मांढरे आणि त्यांचे सहकारी क्लिनिकमध्ये होते. गोंधळ ची बातमी मिळतात महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि डॉक्टरला घेऊन पोलीस स्टेशनला आले. डॉक्टरच्या निष्काळजीपणा तिचा मृत्यू झाला आहे का? डॉक्टर विरोधात काय कारवाई केली जाते ? हे पोलिस तपासा अंती समोर येणार आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रियंकाच्या नातेवाईकांनी डॉक्टर विरोधात ठोस कारवाईची मागणी केली आहे.