नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ / प्रतिनिधी – यवतमाळ मध्ये आज मूर्तिकारांनी अनोखे आंदोलन केले आहे. गणपती बाप्पाच्या मुर्ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले. मोठ्या मेहनतीने गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार केल्या. मात्र पीओपीच्या मुर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. खरंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे पर्यावरणाची हानी होते. मात्र यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासन कुठेही कारवाई करताना दिसत नाही.अशा संतप्त प्रतिक्रिया मूर्तिकारांनी माध्यमांना दिल्या.
यवतमाळच्या मूर्तीकरांनी गणपती बाप्पाच्या मुर्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून तिथे ठेवल्या आहेत. मातीच्या मूर्ती तयार केल्या मात्र त्या मुर्त्या विकल्या गेल्या नाही त्यामुळे आर्थिक फटका बसलाय. हा सर्व फटका प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे बसलाय, असे मूर्तिकारांचे आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूर्तिकारांनी हे आंदोलन केल्याचे सांगितले. या झालेल्या तोट्याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीयावेळी प्रशासनाला करण्यात आली.