नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात क्रीडा संकुलनाचे काम गेले २३ वर्षे रखडले आहे. मोहोळ तालुक्यासाठी या क्रीडा संकुलनाचे काम २३ वर्षापूर्वी मंजूर झाले असले तरी अद्याप कोणत्याही कामाची सुरुवात नाही. क्रीडा संकुल नसल्याने खेळाडूंबरोबर वृद्ध नागरिक, बालकांचे देखील होत आहे गैरसोय होत आहे.
राजकीय इच्छाशक्तीच्या आभावामुळे रखडले असे पैलवानांचे म्हणणे आहे. सशक्त आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या तालुकाच्या रखडलेल्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष घालावे ह्यासाठी मोहोळ तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासमोर पैलवानांनी जोर बैठका मारत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
क्रीडा संकुलाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा अन्यथा, मोहोळ तालुक्यातील 500 पैलवानांसमवेत क्रीडा कार्यालयात मारणार ठिय्या असल्याचे पैलवानांकडून इशारा प्रशासनाला इशारा देण्यात आला.