नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – मालवाहू वाहनात रासायनिक पदार्थांची ने-आण केली जात असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. अन्यथा रस्त्यावर भरधाव वेगेत जाणाऱ्या वाहनाचे घर्षण होवून त्यातून आगीची ठिणगी पडून अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक घटना नंदुरबार येथे घडली.
नवापूर तालुक्यातील पानबारा गावा नजीक राष्ट्रीय महामार्ग आहे.या महामार्गा वरुन गुजरात मधून आलेला रासायनिक पदार्थाने भरलेला ट्रक रायपुरला जात होता. ट्रक मध्ये असलेल्या बॅटरीच्या शॉर्टसर्किटने आग लागली. थोड्याच वेळात आगीने उग्र रूप धारण केले.या नंतर महामार्गावर मोठी धावपळ उडाली.मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला.
त्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस मदत केंद्र येथे संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महामार्गावरील कंपनीला संपर्क करून तात्काळ पाण्याचा भरलेला टँकर मागविला आणि ती आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
केबिनला आग लागल्यामुळे ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने ट्रक मध्ये भरलेला ज्वलनशील पावडरला आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा मोठी घटना झाली असती.