नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – खानदेश कन्या कवयीत्री बहिणाबाई चौधरी यांना आज १४३ सा व्या जयंतीनिमित्त त्यांच्याच कवितांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली.जळगाव शहरातील चौधरी वाड्यातील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट तर्फे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधील आमंत्रित केलेल्या आठ कवींची उपस्थिती होती. यावेळी कवींनी त्यांच्या स्व रचीत तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे वाचन करून बहिणाबाई चौधरी यांना आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कवींचा स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त ज्योती जैन, धुळे येथील ज्येष्ठ कवी जगदीश देवपूरकर बहिणाबाई चौधरी यांच्या नात सून , पणतू सून, आणि खापर पणतू यांचीही उपस्थिती होती.