नेशन न्यूज मराठी टीम.
सातारा/प्रतिनिधी – कराड येथील मुजावर कॉलनी परिसरात एका घरात अचानक अज्ञात वस्तूचा स्फोट झाल्याने घरातील पाच व्यक्ती जखमी झाले आहेत.बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून हा स्फोट कोणत्या कारणाने झाला हे मात्र अद्यापही समजू शकले नाही.या घटनेमुळे कराड परिसरात एकच खळबळ उडाली असून कराड पोलीस देखील या घटनेचा कसून तपास करत आहेत.कराड तालुक्यातील मुजावर कॉलनीतील एका घरामध्ये अचानकच भीषण असा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली अचानकच स्फोटाचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक चांगलेच घाबरले होते हा स्फोट कशामुळे झाला आहे.हे मात्र आद्यप ही समजलेले नाही.
स्फोट इतका भीषण होता की ज्या घरात झाला ते कोलमडले आहे, तसेच मुजावर कॉलनी परिसमरातील घरांना तडे गेले आहेत.तर या स्फोटमध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.कराड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या स्फोटबद्दलची माहिती घेण्यास सुरुवात केली असून अद्याप ही पोलिसांना हा स्फोट कशाने झाला आहे याचा सुगावा लागलेला नाही त्यामुळे पोलीस देखील या घटनेचा कसून तपास करत आहेत.