नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – जागतिक’ स्तरावर बालकांच्या हक्काचा जाहीरनामा जाहीर होवून भारताने त्यावर सही केल्याने एक नागरिक म्हणून बालकांविषयी सजग असणे आपले कर्तव्य आहे. बालकांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंब व समाजाने करायच्या कर्तव्याच्या चर्चा आपण वेळोवेळी ऐकतो. इथे मात्र कुटुंबातच जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचे प्रकरण डोंबिवली येथे घडले आहे.
मृत मुलीची आई काही कामासाठी बाहेर गेली असता यादरम्यान आरोपी कामावरून घरी आला. घरामध्ये मुलीला एकटी पाहून त्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली व पसार झाला आहे. मृत बालिकेची आई जेव्हा घरी आली तेव्हा या संबंधित पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू करून मृत बालिकेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर तिच्या वडिलांच्या विरोधात खुन्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हत्या करणाऱ्या वडिलांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून, जन्म देणाऱ्या पिताने आपल्या दहा वर्षीय मुलीची हत्या केल्याने डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.