प्रतिनिधी.
डोंबिवली– मुंबई शहर हे पाकव्याप्त काश्मीर असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्याने शिवसेना प्रचंड संतापली आहे.डोंबिवली शिवसेना जनसंपर्क कार्यालयाबाहेर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी कंगना राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चपला मारल्या.मुंबई बद्दल अश्या प्रकारे बोलणाऱ्या कंगनाला भारतात राहण्याचा काहीही अधिकार नाही,तिने पाकिस्थानात निघून जावे असे यावेळी शिवसेना पदाधिकारी वैशाली दरेकर यांनी संगीतले.यावेळी मंगला सुळे,किरण मोंडकर,सुप्रिया चव्हाण,गुलाब म्हात्रे,सीमा अय्यर,प्रतिभा शिरोडकर, प्राजक्ता दळवी, कविता डोंगरकर यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.तसेच भाजप हा कंगना राणावतचा खांदा वापरून राजकारण करत आल्याची जहरी टीका यावेळी वैशाली दरेकर यांनी केली.यावेळी सोशल डीन्स्टिसिंग करून आंदोलन करण्यात आले.