मुंबई/प्रतिनिधी – भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचविण्यासाठी राज्यात ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग’ (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्त्व असल्याने शासकीय- निमशासकीय विभाग, अशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, युवा-स्त्रिया, दिव्यांग, तृतीय पंथी, ग्रामीण-शहरी नागरिक, आदिवासी, स्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितरित्या कार्य करणे आवश्यक आहे. सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
दृकश्राव्य माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग (systematic voter education and electoral participation) ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे स्वीप सल्लागार श्री.दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त रूबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनावणे, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खटाळ, कृषी विभागाच्या सरिता देशमुख, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, एड्स नियंत्रण संस्था आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, सहभाग हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा घटक असून, प्रत्येक विभागाच्या सहभागानेच हे शक्य आहे. नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे, नावात बदल अथवा इतर काही बदल करावयाचे असल्यास ते कशापद्धतीने करावयाचे यासंदर्भात मतदार जागरूकता मंचांतर्गत (VAF) जागरूकता करणे गरजेचे आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटीत-असंघटीत कामगार, युवा, प्राध्यापक, वंचित घटकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, अशा अनेक घटकांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय विभागाने एका अधिकाऱ्याची स्वीप या कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून निवड करावी. ग्रामविकास विभागाने संविधान दिनानिमित्त विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये मतदारांच्या याद्या वाचाव्यात जेणेकरून ज्या मतदारांचे नाव नसेल त्यांना माहिती देता येईल. प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने जागृतीपर कार्यक्रम राबवावे व प्रसिद्धी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विविध विभागांच्या सूचनांचाही विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले, मतदार जनजागृती संदर्भात विविध उपक्रमांना महासंचालनालयामार्फत प्रसिद्धी दिली जाईल. विविध समाज माध्यमांमार्फत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविता येईल. ‘लोकराज्य’ या मासिकामध्ये स्वीप कार्यक्रमासंदर्भात विशेष प्रसिद्धी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
स्वीप सल्लागार दिलीप शिंदे यांनी लोकशाही सक्षमीकरणासाठी मतदार जागृती कार्यक्रम एकत्रितरित्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले. विविध विभागांनी विविध उपक्रम राबवावे, यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा जेणेकरून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येईल, असेही त्यांनी सांगितले.
स्वीप कार्यक्रमाच्या आयकॉन आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या नेमबाज राही सरनोबत यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये बॅनरच्या माध्यमातून क्रीडापटूंना व नवमतदारांना स्वीप कार्यक्रमाची माहिती देता येईल. भारत निवडणूक आयोगाच्या विविध मोबाइल ॲप्सचाही त्यांना वापर करता येईल. तसेच एखादी चित्रफित किंवा संदेशाचा डिजिटल माध्यमांतून प्रसार करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर किंवा खेळाडूंचेही सहकार्य घेता येईल असे सांगितले.
विविध शासकीय-निमशासकीय विभाग, सामाजिक संस्था यांनीही यावेळी आपल्या सूचना मांडल्या.
Related Posts
-
राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्वीम २०२३
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - देशातील लोकशाहीच्या…
-
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार
प्रतिनिधी. मुंबई- राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे…
-
कृषी विभागामार्फत गावोगावी राबण्यात येणार बीजप्रक्रिया मोहीम
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नाशिक/प्रतिनिधी - कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या…
-
उद्यापासून केडीएमसी क्षेत्रात बूस्टर डोस देण्यात येणार
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 10 जानेवारी 2022…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
त्रिपुरा प्रदेश राज्य परिषदेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - त्रिपुरातील राज्य परिषदेत…
-
पशुवैद्यकीय पदवीधरांना संधी, कत्तलखान्यांच्या क्षमतेनुसार नेमणूक करण्यात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नोंदणीकृत खाजगी पशुवैद्यकीय पदवीधरांची…
-
नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार,राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष…
-
डोंबिवलीत ‘सोलार रुफ टॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी रॅली
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/ संघर्ष गांगुर्डे - घरगुती ग्राहकांच्या…
-
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने २१५-…
-
भरड धान्याबाबत जनजागृतीसाठी इंडिया टुरिझमचा विशेष उपक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने …
-
मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशभरातील मान्यताप्राप्त संस्था…
-
आता महामार्गाच्या निर्मितीमध्येही गुंतवणूक करता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…
-
मतदान जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भव्य बाईक रॅली
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/Vw7QuEgYOxA?si=5qHZTxN-uBiuYjDw कल्याण/प्रतिनिधी -गेल्या निवडणूकीतील कल्याण…
-
२०२४ मध्ये भाजप सत्तेत येणार नाही - संजय राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - सध्या देशभर…
-
मतदार जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेस ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशाचे भावी…
-
‘सोलर रुफटॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी कल्याण परिमंडलात मेळावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केंद्र सरकारचे नवी…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
जादूटोणा विरोधी कायद्या जनजागृतीसाठी अनिसची राज्यव्यापी जनसंवाद यात्रेला सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - राज्यात जादूटोणा…
-
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने आज…
-
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाकरिता पोटनिवडणूक – २०२२ कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र…
-
आगामी कल्याण मनपा निवडणुकीत भाजपाची सत्ता येणार- केंद्रीयमंत्री कपिल पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार…
-
पारंपारिक मौखिक साहित्य जपण्यासाठी वंजारी महिला शाखेतर्फे पारंपारिक गीतांचा कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा…
-
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमानुसार कडक अंमलबजावणी करण्यात येणार - पालघर जिल्हाधिकारी
प्रतिनिधी . पालघर - पालघर जिल्ह्यामध्ये कोविड -19 विषाणूची बाधा…
-
मतदार नोंद जनजागृतीसाठी केडीएमसी व महाविदयालयाच्या प्रतिनिधिंची बैठक संपन्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार…
-
गिरगाव चौपाटीवर १३ देशांतील स्पर्धकांचा नौकानयनाचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा…
-
ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी उद्या मुंबईत चित्ररथाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - महाऊर्जातर्फे दरवर्षी दि. 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा…
-
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन नुज मराठी नेटवर्क. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या…
-
ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात…
-
दाढीवाले बाबांच्या कार्यक्रम ठरलेला निर्धार मेळाव्यात नाना पटोलेचे टिकास्त्र
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - राज्यभर निवडणुकीचे वारे वाहताना…
-
राज्यस्तरीय डाळिंब परिसंवाद कार्यक्रम संपन्न
मालेगाव/प्रतिनिधी - कृषी विद्यापिठाच्या विविध संशोधनाने शेतकऱ्यांच्या उत्पादनात क्रांतीकारक बदल घडून…
-
डिजीलॉकर मध्ये आता आरोग्यविषयक कागदपत्रे डिजिटल पद्धतीने संग्रहित करता येणार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - डिजीलॉकर हे इलेक्ट्रॉनिक्स…
-
चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राभर विविध कार्यक्रम
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इस्त्रो (ISRO), अर्थात…
-
पारसिक डोंगरातील डावा बोगदा खुला करण्याचा कार्यक्रम संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मुंबई महानगर प्रदेश विकास…
-
अहमदनगर आगामी काळात लॉजिस्टिक पार्कचा जिल्हा म्हणून नावारूपास येणार - मंत्री नितीन गडकरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. अहमदनगर/प्रतिनिधी - अहमदनगर जिल्ह्यात केंद्रीय महामार्ग…
-
राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू, महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही– पशुसंवर्धनमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमुने,…
-
राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील…
-
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनातील कलाकृती आठ दिवसात घेऊन न गेल्यास कलाकारांचा हक्क संपुष्टात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मुंबई…
-
नीती आयोगाचा ग्रोथ हब कार्यक्रम मजबूत सहकार्यात्मक संघराज्यवादाचा दाखला
नेशम न्यूज़ मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी- नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
लोकसभेला दिव्यांग व वृध्द मतदारांना घरातूनच करता येणार मतदान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी…
-
२२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार
मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत…
-
रायगड जिल्हातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम २०२२ जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग - राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील…