महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

महिलेवर प्राणघातक हल्ला करून चैन हिसकावणारा चोरटा जेरबंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – रस्त्याने चालणाऱ्या महिलेची चैन हिसकवण्यासाठी धारदार शस्त्राने हल्ला करत तिची चैन हिसकावणाऱ्या चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्यात. आरोपी अश्विन सदाफुले हा मोहने परिसतात राहतो. काही महिन्यांपूर्वी तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. मात्र, काम सुटल्याने तो बेरोजगार होता. आर्थिक चणचनीतुन त्याने चोरीचा मार्ग निवडला. फक्त चोरीचा त्याच्या उद्देश होता की, आणखी काही प्रकार आहे? याचा तपास खडकपाडा पोलीस करत आहेत.

मंगळवारी दुपारी महिला आपल्या मुलीला शाळेतून घेण्यासाठी जात असताना तिच्या पाठीमागे येऊन तिची चैन चोरण्याचा प्रयत्न आरोपी ने केला. त्या दरम्यान महिलेने प्रतिकार केल्याने आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून पसार झाला होता. पोलीस अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. अखेर आरोपीला अटक करण्यात आले आहे. व महिलेवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×