मुंबई/प्रतिनिधी – राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते. याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होत. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि राज्यातील बैलगाडा मालक आणि संघटनेचे पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धनमंत्री श्री. केदार म्हणाले, संविधान आणि घटनेचा आदर करुन शर्यतीच्या सरावासाठी कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. येत्या महिन्याभरात योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ज्या राज्यात बैलगाडा शर्यत सुरु आहे. त्यांचाही अभ्यास करण्यात येईल. तसेच याबाबत गरज भासल्यास नवीन कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार असल्याचेही श्री.केदार यांनी यावेळी सांगितले.राज्यात खिल्लार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांचे संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, बैलांना सराव महत्त्वाचा आहे. शर्यती आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. यासाठी सराव सुरु करण्यासाठी दिलासादायक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील बैलगाडा स्पर्धा पूर्ववत सुरु राहण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्न करीत आहेत. स्पर्धा सुरु करण्यासाठी सर्व विधानसभा सदस्य सकारात्मक आहेत. मंत्रालयातील प्रांगणात प्रथमच अशी बैठक पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी घेतल्याबद्दल श्री.पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, शेतकरी आणि बैलगाडा मालक आणि विविध संघटनांचा शर्यत हा जिव्हाळ्याचा विषय आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. बैलांचा सराव सुरु करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बैठक बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी राज्यातून आलेल्या बैलगाडा मालक आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मागण्या व सूचना मांडल्या. उपस्थित आमदारांनी बैलगाडा शर्यतीविषयी मनोगत मांडले.
Related Posts
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
भिवंडीतील जिल्हा कोविड रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
भिवंडी/ प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भिवंडी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत…
-
बैलगाडा शर्यतींमधल्या केस मागे घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
मतदान करण्यासाठी नागरिकांच्या मोठया रांगा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. जळगाव/प्रतिनिधी - देशभरात आज लोकसभा…
-
कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील…
-
नरीमन भवनमध्ये पर्यटन संचालनालयाचे नवीन कार्यालय सुरु
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या स्वतंत्र नवीन कार्यालयाचे उद्घाटन…
-
मच्छिमारांना लवकरच मिळणार डिझेलवरील परतावा
मुंबई - डिझेल परताव्यासाठी सन २०२० – २१ या वर्षासाठी करण्यात…
-
नवी मुंबईत इव्ही चार्जिंग स्टेशन सुरु
मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील तुर्भे येथे मॅजेंडा कंपनीने सुरू केलेल्या…
-
तुर हमिभाव खरेदी केंद्र सुरु करण्याची स्वाभीमानीची मागणी
प्रतिनिधी. सोलापूर - या वर्षी पाऊस चागला पडल्याने या वर्षी…
-
पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद…
-
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. हिंगोली/प्रतिनिधी - सध्या रब्बी पिकाला…
-
महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीत दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - आज दीक्षाभूमीवर महामानव डॉ.…
-
लवकरच कैद्यांना कारागृहातून फोनवर कुटुंबियांशी बोलता येणार
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे / प्रतिनिधी - कारागृहातील कैद्यांना…
-
छत्रपती शासन गणेश मित्र मंडळाने साकारला बैलगाडा शर्यतीचा देखावा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाने…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याने, २६ ऑक्टोंबर ते…
-
पतसंस्थेच्या प्रशासनाला जागे करण्यासाठी सदस्यांचे थाळी वाजवा आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर / प्रतिनिधी - संभाजीनगर येथे…
-
दिवा रेल्वे स्थानकाचा लवकरच होणार कायापालट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे -दिवा रेल्वे स्थानकातील…
-
महाराष्ट्रात निघणार कॉंग्रेसची जनसंवााद पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - गेल्या दहा…
-
राष्ट्रपती पदाच्या निवडणूक तयारीची पाहणी करण्यासाठी अधिकारी नियुक्त
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक…
-
आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी सुरु
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डॉबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग, बालकांचा मोफत…
-
आता वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक…
-
वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कृतीदल स्थापन
प्रतिनिधी. मुंबई - कोविड-19 या विषाणूमुळे होणारा संसर्ग टाळण्याकरिता वाहतुकीसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी…
-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी कल्याणात वंचितचे निवेदन
प्रतिनिधी. कल्याण - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी केंद्र सरकारने केलेले शेतकरी…
-
रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल सुसज्ज
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - रेमल चक्रीवादळाचा…
-
२० ऑक्टोबरपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे…
-
कडक उन्हापासुन टोमॅटोचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - आपल्या रोजच्या आहारात…
-
कोरोनाग्रस्त कुटुंबियांची सेवा करण्यासाठी सरसावली तरुणाई
कल्याण प्रतिनिधी - पहिल्यापेक्षा अधिक भयंकर असणाऱ्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये…
-
डोंबिवली येथील कोपर पूल गणेशोत्सवापूर्वी सुरु होण्याचे संकेत
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली येथील कोपर पूल गेल्या दोन वर्षापासून…
-
बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी मंत्रीमंडळाने घेतला हा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि…
-
कल्याणातील सिग्नल यंत्रणेवर लवकरच मराठीतूनही दिसणार सूचना
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण शहरातील काही मुख्य चौकात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत…
-
रक्तटंचाई दूर करण्यासाठी संत निरंकारी मिशनचे निरंतर प्रयत्न
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली रक्ताची टंचाई दूर…
-
मुंबईत गोवर रोगाच्या प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. मुंबई/प्रतिनिधी- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण…
-
केडीएमसी क्षेत्रात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील सर्व नागरिकांचे…
-
कल्याणात चैत्यभूमीची प्रतिकृती,बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. https://youtu.be/dUfuZ78bIp8?si=FYc6u4dXXisjnhRw कल्याण/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ…
-
केडीएमसीच्या नागरी आरोग्य केंद्रातील ओपीडी संध्याकाळी देखील राहणार सुरु
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांना दिलासा मिळाला असून केडीएमसी…
-
सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय लवकरच – मुख्यमंत्री
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात…
-
मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे काम सुरु - सचिन अहिर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे…
-
तृतीयपंथीयांच्या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी फेलोशिप, प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. अलिबाग- भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत कार्यरत…
-
कोरोनाची भिती दूर करण्यासाठी जनप्रबोधन आवश्यक- मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख
प्रतिनिधी. ठाणे - करोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती…
-
मोहोळ येथे होणार लवकरच सुसज्ज कोविड केअर सेंटर
सोलापूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी रुग्णाना योग्य उपचार मिळावे.त्यांच्या…
-
नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय
मुंबई/प्रतिनिधी - नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले…
-
एमपीएससी मार्फत साडेपंधरा हजार पदाची भरती लवकरच होणार
मुंबई/प्रतिनिधी - सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना…