महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

ड्रग्स विकणाऱ्या दोन नायजेरियनसह एका रिक्षा चालकाला ठाणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे गुन्हे अन्वेशण विभाग युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की एक नायजेरियन इसम ड्रग्स विकण्यासाठी घोडबंदर रोड येथील बाईक हॉटेल समोर कोकेन हा अमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे, त्या प्रमाणे वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल समोर सापळा रचला असता पॉल चुकवू या 48 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ 12,80,000/-रुपये किमतीचे 32 ग्रॅम कोकेन व 1,20,000/-रुपये किमतीचे LSD हे अमली पदार्थ,1940 रुपये रोख रक्कम व एक मोबाईल फोन असा 14,01,940/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला.

त्यानंतर त्याच्या विरुद्ध कासारवडवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच 31 तारखेला इंदिरानगर वागळे इस्टेट येथे एक नायजेरियन व्यक्ती रिक्षातून ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्या प्रमाणे गोक लॉरेन्स अजाह वय 32 वर्ष राहणार नालासोपारा याला व रिक्षा चालक लक्ष्मण अनिरुद्ध साव वय27 वर्ष राहणार इंदिरा नगर यांना ताब्यात घेण्यात आले, त्याच्या ताब्यातून 46,00,00/- रुपये किमतीचे 115 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ, एक रिक्षा,1000 रुपये कॅश असा 47,01,000 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.त्यांच्यावर गुन्हादाखल करून अटक करण्यात आली आहे. व पुढील तपास पोलिस करत आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील,सहाय्यक आयुक्त निलेश सोनावणे,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके,पोलीस निरीक्षक नितीन पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे,अविनाश महाजन, पोलीस उप निरीक्षक शिवाजी कानडे,सहाय्य्क पोलीस उप निरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार सुशांत पलांडे,रोहिदास रावते, प्रकाश पाटील,विजय काटकर,सुनील निकम,न्हावळदे,सुनील रावते,संदीप शिंदे,मीनाक्षी मोहिते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×