नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स चौकात दादर येथील चैत्यभूमीची प्रतिकृती साकारली जाणार आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या चैत्यभूमीच्या हुबेहुब प्रतिकृतीच्या माध्यमातून बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे.
तरी यावेळी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमावे असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.