नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – वॉकिंगसाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करुन लूटणाऱ्या तिघांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. रोहित उबाळे, विशाल जाधव आणि रोहित गायकवाड या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिासांनी दिली आहे.
कल्याण वालधूनी परिसरात राहणारे आनंदा घाडगे हे २० नोव्हेंबर रोजीच्या रात्री १२ वाजता जेवणानंतर रस्त्यावर फिरत होते. तीन जण त्यांच्या जवळ आले. त्यांनी पैशाची मागणी केली. आनंदा यांनी स्पष्ट नकार दिला. नकार दिल्यानंतर या तिघांनी आनंदा यांना रॉडने मारहाण सुरु केली. मारहाण करीत असताना काही नागरीकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना देखील या तिघांनी जो मध्ये पडेल त्याला खल्लास करणार अशी धमकी दिली. जे लोक जवळ येत होते. त्यांना मारहाण करीत होते. मारहाणी दरम्यान एकाने आनंदा यांच्या खिशातून ८२० रुपये काढून घेतले त्यांना रस्त्यावर सोडून निघून गेले.
परिसरात दहशत माजवून एका व्यक्तीला लूटण्यात आल्याची माहिती मिळताच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ट पेलीस निरिक्षक शैलेश राऊत यांनी त्वरीत या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली. तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या तिघांच्या विरोधात आणखीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.