नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – मंत्री छगन भुजबळ आज त्यांचा मतदार संघ असलेल्या येवल्याच्या दौरावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भरवस फाट्याजवळ काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. त्यानंतर भुजबळ त्यांच्या येवला संपर्क कार्यालयावर आल्या नंतर त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधून जरांगे पाटील यांचे नाव नं घेता त्यांच्यावर टीका केली. जशी संस्कृती तशी टीका केली जाते. ज्याचे शिक्षण, संस्कृती जशी असेल तसेच ते खालच्या पातळीवर टीका करतील. टीका करायला चांगले शब्द सापडतात ना.चांगल्या शब्दाचा अभ्यास नसेल तर ते तसेच बोलतील.माणसाने सुसंस्कृत असेल पाहिजे. थोड शिक्षण कमी असले तरी चालतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे असे भुजबळ म्हणाले.
आम्ही मराठा आरक्षणाला विरोध केला का ? शरद पवार, मुख्यमंत्री यांच्यासह सगळ्याच राजकीय नेत्यांचे हेच म्हणणे आहे.शेड्युल ट्राईब व शेड्युल कास्टवाले कोणाला मध्ये घेतात का ? ३७४ जाती आहे ओबीसीमध्ये ५४ टक्के आरक्षण आहे. मराठा समाज त्यात आला तर छोट्या जातीवल्यांवर अन्याय होईल.ओबीसीमधील अनेक छोट्या जाती गरीब आहेत. २७ टक्के मागतोय अजून १० टक्के पण मिळालेले नाहीत. अजून हे आले तर कोणालाच काही भेटणार नाही.आरक्षण त्यांना मिळालेच आहे थोडीशी अडचण आहे ती दूर होईल.क्युरेटीव्ह पीटिशन – तीन न्यायमूर्ती बसलेले आहे.मार्ग काढतील, ओबीसीतच घेईल हा अट्टाहास का ? सरकार जर हा अट्टाहास पूर्ण करायला लागता तर ओबीसी सुद्धा नाराज होतील. मराठा समाज मतदान करणार नाही म्हणता तसे ओबीसीवर अन्याय होईल मग तेही मतदान करणार नाही. त्यांना घाबरून जर करणार असाल तर आम्हालाही काही करावे लागेल.सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी ला धक्का न लावता दिले पाहिजे.हीच आमची मागणी आहे.पहिल्यापासून आमचे तेच म्हणणे आहे.