नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – जंगलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मानवाने आपल्या राहत्या घरासाठी शहराच्या दूर जंगलात देखील वृक्ष तोड करून आपल्या कुटुंबाच्या निवाऱ्याची सोय केली आहे. शहरीकरणाचा परिणाम वन्य जीवावर देखील पाहायला मिळतो. या वन्यप्राण्यांचा भक्ष आणि निवाऱ्याचा शोध मानवी वस्तीपर्यत येवून थबकला आहे. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. येवला तालुक्यातील विसापूर येथील गावा जवळील संतोष सिताराम सोनवणे यांच्या मालकीच्या विहिरीत शिकारीच्या शोधात असणाऱ्या बिबट्या पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास हा बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात त्याने दोन शेळ्या एका कुत्र्याची शिकार केली असल्याचे समजते. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याला विहिरीच्या बाहेर काढण्यासाठी वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे.