नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – नव्या संसदेत नवीन जुमला. महिला आरक्षणासंदर्भात लोकसभेचे विधेयक आणलं गेलं त्याचा उदो उदो केला. सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. महिलांनाही प्रतिनिधित्व मिळेल असं वाटत असताना नव्या जुमल्याला समोर जावं लागलं. मताचं राजकारण किती घाणेरडं असू शकतं हा नवा पायंडा राजकारणात बघायला मिळत आहे. संसदेत घोषणा केली पण 2026 मध्ये जनगणना होईल. 2029 मध्ये अंमलबजावणीची ही भूमिका आहे. तोपर्यंत राहुल गांधीचे, काँग्रेसचे इंडिया आघाडीचे सरकार असेल आणि महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेसच करेल इंडिया करेल. त्यासाठी या जुमलेबाज सरकारची वाट बघायची गरज पडणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
राजकारणात सत्तेसाठी किती लाचारी सहन करावी. सत्तेसाठी सर्व मर्यादा आता ओलांडल्या दिसत आहे. अजित दादा तुम्ही वाघ आहेत. पण ज्या पक्षासोबत सत्तेत गेले त्यांच्यात पक्षातील एक जण तुम्हाला लांडगा म्हणतोय हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. अजितदादा तुम्ही वाघ आहात. एकदा तुम्ही जरा दाखवाच. सत्तेसाठी लाचार नाही ते. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या अशी अपेक्षा असल्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.