नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मुंबई – भारतीय नौदलाचे कमांडर एस कार्तिकेयन यांची कन्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन हिने 27 जून 2022 रोजी माऊंट डेनाली (20310 फूट) शिखरावर तिरंगा आणि नौदलाचा ध्वज फडकावला. ही कामगिरी करणारी काम्या सर्वात तरुण भारतीय ठरली आहे .
अलास्कातील हे दुर्गम शिखर उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर असून बहुधा सात आव्हानात्मक शिखरांपैकी चढाईला सर्वात कठीण शिखर आहे. या मोहिमेसह तिने सातही खंडातील सर्वोच्च शिखरे गाठण्याचा आणि दोन्ही ध्रुवांवर स्कीईंग करताना पाचवा मैलाचा टप्पा पार केला आहे. माउंट एव्हरेस्ट आणि माउंट विन्सन, आणि ध्रुवीय स्की ट्रॅव्हर्स अद्याप शिल्लक असताना, काम्या एक्सप्लोरर्स ग्रँडस्लॅम पूर्ण करण्यासाठी सज्ज असून अशी कामगिरी करणारी ती सर्वात लहान मुलगी असावी.