महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image तंत्रज्ञान थोडक्यात

केडीएमसीच्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवले एकापेक्षा एक दिशादर्शक मॉडेल

नेशन न्यूज मराठी टीम.

https://youtu.be/rKBL5cKehKc

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – विज्ञान प्रदर्शनासारख्या दर्जेदार कार्यक्रमाच्या आयोजनातून उद्याचे नेतृत्व, सुजाण नागरिक आणि देशाचे भवितव्य घडणार आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. कल्याण मधील वायलेनगर येथील रिटा मेमोरिअल स्कुलमध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील प्रार्थमिक शाळांसाठी आयोजिलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन समयी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. विज्ञान प्रदर्शनातील शाळकरी विद्यार्थ्यांनी बनविलेले मॉडेल्स् अतिशय सुंदर आणि दिशादर्शक आहेत. या मुलांचे पर्यावरणाबद्दल, स्वच्छतेबाबत, घनकचरा व्यवस्थापनाबाबतचे ज्ञान पाहून मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे अशा शब्दात महापालिका डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्तरावर भरविलेल्या या विज्ञान प्रदर्शनात पर्यावरणीय चिंता, आरोग्य आणि स्वच्छता, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती , पर्यावरणास अनुकूल सामग्री, वाहतूक आणि नवोपक्रम, वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास, आमच्यासाठी गणित आदी विविध विषयांवर प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्पांचे चित्तवेधक सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते. सदर प्रदर्शनाचे आयोजन २ दिवसांसाठी करण्यात आले असून यामध्ये महापालिकेच्या २१ शाळा आणि खाजगी ४२ शाळा अशा एकूण ६३ शाळा सहभागी झालेल्या आहेत. या उद्घाटन समयी शिक्षण विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे, परिमंडळ-१ चे उपायुक्त धैर्यशील जाधव, प्रशासन अधिकारी विजय सरकटे, संस्था अध्यक्ष पेरापल्ली पॉल व इतर मान्यवर उपस्थित होते.

भविष्यातील तंत्रज्ञान काय आहे, भविष्यातील करिअर आणि करिअरचे पर्याय काय आहेत याची माहिती आपल्या इथल्या पालक आणि मुलांना होण्याच्या उद्देशाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×