नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात, कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींनंतर आणि आर्थिक गैरव्यवस्थापन व मनमानी कारभाराबाबत खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर भारतीय कुस्ती महासंघात सुशासनाला चालना देण्यासाठी आणि खेळाडूंच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, क्रीडा मंत्रालयाने लैंगिक शोषण, छळ आणि/धमकी, आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय त्रुटींबाबत प्रमुख खेळाडूंनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक निरीक्षण समिती स्थापन केली आहे. ही निरीक्षण समिती चौकशी दरम्यान, भारतीय कुस्ती महासंघाचा दैनंदिन कारभार देखील पाहिल.
खेलरत्न पुरस्कार विजेती आणि ऍथलिट आयोगाची अध्यक्ष एमसी मेरी कोम या समितीची अध्यक्ष असेल तर भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे कार्यकारी परिषद सदस्य खेलरत्न पुरस्कार विजेते योगेश्वर दत्त, मिशन ऑलिम्पिक सेलची सदस्य ध्यानचंद पुरस्कार विजेती तृप्ती मुरगुंडे, भारतीय क्रीडा प्राधिकरण , TEAMS च्या माजी कार्यकारी संचालक राधिका श्रीमन, टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल (निवृत्त) राजेश राजगोपालन हे अन्य सदस्य असतील.
निरीक्षण समिती 4 आठवड्यांत चौकशी पूर्ण करेल. तसेच मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यकारी समितीला पुढील सूचनेपर्यंत तात्काळ प्रभावाने, महासंघाच्या दैनंदिन कारभाराच्या व्यवस्थापनापासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.