नेशन न्यूज मराठी टिम.
बुलढाणा/प्रतिनिधी– मानसिक दृष्टया दिव्यांग असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर घरात घुसून ऑगस्ट २०२३ रोजी पीडिताचे आईवडील मजुरीकरीता बाहेर गेलेले असताना दुपारी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी याने सोनाळा पोस्टे हद्दीतील एका गावात पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. सदर खटल्यात खामगाव येथील जिल्हा व सत्रन्यायाधीश 2 तथा विशेष न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय खामगाव पी.एस. कुलकर्णी यांनी निकाल दिला आहे.
सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत उपरोक्त घटनेची फिर्याद वडिलांनी पोलिसात दिली होता. त्यानंतर सदर खटला हा खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आला. या खटल्यात आरोपी राम भारत पालकर यास वरील शिक्षेंसह दंडाची रक्कम भरली नाही तर अतिरिक्त 28 महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती पूर्ण रक्कम पीडित व पिडितेच्या कुटुंबियांस नुकसान भरपाई म्हणून अदा करण्यात यावी, असा आदेशही न्यायाधीश बीपी कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच कलम 357 अंतर्गत नुकसानभरपाई व पुनर्वसन निधी अदा करण्याविषयी जिल्हा विधी सेवा समितीने सुद्धा न्यायाधीश यांनी शिफारस केलेली आहे.
या खटल्यात पीडिता, वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी ढाकणे, डॉ. प्रशांत टिपले, संजय कोल्हे, डॉ.चैतन्य कुलकर्णी व डॉ. अजय बिहाडे यांच्यासह तपास अधिकारी वाघमोडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. यामध्ये उपरोक्त आरोपीला कलम 452 अंतर्गत 7 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रूपये दंड, कलम 376 अंतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचार कलमाखाली 20 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड न भरल्यास एक वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले असून, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाविस्कर (सौ. भालेराव) यांनी खटल्यात युक्तीवाद केला आहे.