नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – कौटुंबिक हिंसाचारा व्यतिरिक्त महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची इतरही कारणे असतात. लहान मुली, युवती ,महिला यांना आपल्या वयाच्या विविध टप्प्यावर कुठल्या न कुठल्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. यातून हिंसात्मक हल्ले देखील होतात. आणि काही प्रसंगी मृत्यू देखील ओढवतो. अशीच घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील आरोपीस अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याबाबत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटामध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत त्वरित तपास केला हा मृतदेह संगमनेर येथील एका अल्पवयीन मुलीचा असल्याचे तपासा त समोर आले होते.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालत कसून चौकशी सुरुवात केली. त्यांचे पथक व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक यांनी या खून प्रकरणाचा सूक्ष्म तपास केला. सीसीटीव्ही कॅमेरे चे फुटेज तपासण्यात आले. या अल्पवयीन मुलीचा संशयित आरोपी व्यक्तीने खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबुली दिली.