नेशन न्यूज मराठी टीम.
हिंगोली / प्रतिनिधी – 6 सप्टेंबर रोजी शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारी क्षेत्रातील प्रशासकीय व इतर सर्व कर्मचारी पदे हि कंत्राटदारांकडून कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. या शासन निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने होताना दिसत आहे.हिंगोलीत देखील बेरोजगार विद्यार्थ्यानी आक्रोश केला.
शासन निर्णय त्वरित रद्द करा अशी मागणी करत हिंगोलीत सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी कृती समितीच्या वतीने हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. सरकारने शासकीय नौकऱ्यांचे कंत्राटी करण करणारा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी करत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आक्रोश मोर्च्यात इतर संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.