Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
ठाणे ताज्या घडामोडी

कल्याण मध्ये मणिपुर घटनेच्या निषेधार्थ  समस्त आदिवासी महिला भगिनींचा मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – मणिपुर येथे महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ व महाराष्ट्रामध्ये स्त्री शक्ती कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये समस्त आदिवासी महिला भगिनींच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदिवासी महिलांनी काळ्या फिती बांधून कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कल्याण तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढत नायब तहसीलदारांना निवेदन सादर केले. यावेळी वंदना कुरूमटे, भावना चांदेकर, कल्पना मंगम, शीतल मंढारी, भारती कुमरे आदींसह इतर अनेक महिला आणि पुरुष पदाधिकारी सहभागी झाले होते.    

४ मे रोजी मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयाद्वारे आढळून आलेला आहे. देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. ३ मे रोजी मणिपूर येथील दोन समुदायातील हिंसाचाराला सुरवात झाली. तेव्हापासून अनेक महिलांना लक्ष करण्यात आले. हि बाब निंदनीय असून असा प्रकार राजरोसपणे स्वतंत्र भारतात केला जातो याची खेद वाटते.  मणिपूर येथील महिलांना ज्या अवस्थेत त्या ठिकाणी फिरवण्यात आले हे माणुसकीला काळिमा फासणारे असून संविधानाचा अवमान, महिलांची अवहेलना करणारी घटना आहे.

आपल्या लोकांचं संरक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असून महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी ‘महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) अॅक्ट २०२० विधेयक २०२० सालच्या अधिवेशनात मांडण्यात आलं होतं. मणिपुर येथे झालेल्या घटनेच्या दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच महाराष्ट्रामध्ये स्त्री शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी या महिलांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X