प्रतिनिधी.
डोंबिवली – डोंबिवलीतील अरुण निवास मित्र मंडळाने ‘दुर्ग पद्मदुर्ग ‘ची सुमारे ५० फूट लांब अशी भव्य दिव्य प्रतिकृती उभारली आहे.मागील गेली १२ वर्ष अरुण निवास मित्र मंडळ महाराष्ट्रात वसलेले किल्यांच्या भव्य अशा प्रतिकृती उभारत आहेत. या मंडळाने वर्ष २००८ पासून सिंधुदुर्ग २० फूट लांब अशी भव्य प्रतिकृती उभारली. प्रत्येक वर्षी हे मंडळ महाराष्ट्रात वसलेले अनेक छोटे मोठे किल्ले उभारत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगाच्या काळात हा किल्ला उपस्थित होताच, या वर्षीही तसाच हुबेहूब संपूर्ण तपशीलवार आणि अचूकतेने बनविला गेला आहे . या स्तराची अचूकता प्राप्त करण्यासाठी संपूर्ण संघाने काम केलं . आपणास किल्ल्याचे प्रदर्शन मिळाल्यावर अरुण निवास मंडळीतील प्रत्येक सदस्यांचे कठोर परिश्रम स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते.तसेच अचुकरित्या माहिती दिली जाते,
जरी काळ हा सतर्कतेचा असला तरीही आपल्या प्रथेस कोणत्याही प्रकारचा खंड पडू न देण्याचा निर्णय या मंडळाने घेतला आणि आपला वारसा आणि महाराजांनी उभारलेल वैभव जास्तीज जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा हेतू मनाला भेदून जातो…
२०२० च्या या covid सारख्या महारोगाच्या लाटेमध्ये सुद्धा, त्या गोष्टीची जाण ठेऊन, सुरक्षा साधन वापरून, प्रत्येकाची काळजी घेत २०२० सालात मुरुडच्या सागर किनाऱ्यावर पश्चिम दिशेला असणाऱ्या समुद्राच्या आत असणाऱ्या खडकाळ भागावर छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत बांधलेला पद्मदूर्ग उर्फ कासा किल्ला याची प्रतिकृती उभारून सर्वाना थक्क केले आहे.
या प्रतिकृती तयार करण्याच्या अरुण निवास मित्र मंडळाचा मुख्य हेतू आणि ध्येय आहे ,ही महान परंपरा टिकवून ठेवणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा संदेश घेऊन भविष्यातील पिढीला प्रेरणा देणे आहे. जवळपासच्या परिसरातल्या अनेक इमारती या मंडळाद्वारे प्रेरणा घेतल्या आहेत आणि त्यांनी त्यांच्या परिसरात किल्ले तयार करण्यास सुरुवात केली आहे.
राजगड (वर्ष २००९, ३५ फूट लांब ५ फूट उंच)
विजयदुर्ग ( जलदुर्ग) (वर्ष २०१०, 25 फूट लांब)
प्रतापगड(गिरिदुर्ग) (वर्ष २०११, ३५ फूट लांब , ५ फूट उंच)
मुरुड जंजिरा(जलदुर्ग) ( वर्ष २०१२, 28फूट लांब)
जगदीश्वराचे मंदिर आणि शिवाजी महाराज समाधी(वर्ष २०१३)–जागेचं अभाव
रायगड( वर्ष २०१४, ४०फूट लांब,४.५फूट उंच)
नळदुर्ग(वर्ष २०१५, ३० फूट लांब ,खास आकर्षण-( रंगमहाल मधील नर आणि मादी पाणी प्रवाह)
सिंहगड(वर्ष २०१६, ४०फूट लांब, ४.५ फूट उंच )
तोरणा ( वर्ष २०१७,५० फूट लांब,५फूट उंच)
पुरंदर (वर्ष २०१८,५५फूट लांब,७.५ फूट उंच)
मागील वर्षी २०१९ खांदेरी -उंदेरी या दुर्गाची 55फूट लांब, अशी भव्य प्रतिकृती उभारली होती.
जर तुम्हाला पद्मदुर्ग बघण्याची इच्छा असेल तर अरुण निवास मित्र मंडळ, अरुण निवास, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली रिक्षा स्टँड जवळ, डोंबिवली (वेस्ट) येथे भेट देऊन पाहता येईल २२ नोव्हेंबर पर्येंत तुम्हाला पाहता येईल.
